राजकीय पक्ष: अर्थ - व्याख्या - महत्व -Political Parties Meaning Definition Importance

राजकीय पक्ष म्हणजे काय?
राजकीय पक्ष म्हणजे लोकांची एक मोठी
टीम असते जी देश चालवण्यासाठी काम करते. या टीममध्ये काही नियम,
विचार आणि योजना ठरवलेल्या असतात. लोकांना आवडले तर ते निवडणुकीत त्या
पक्षाला मतदान करतात.
एका
गोष्टीमधून हे समजवून घेऊयात.
एका गावात
सगळे लोक म्हणाले, "आपल्या गावाचा विकास करायचा आहे — शाळा,
रस्ते, वीज लागते."
गावात तिघांनी पुढे येऊन आपापले विचार सांगितले:
- विवेक म्हणाला: "मी सर्वांना मोफत शिक्षण
देईन."
- सक्षम म्हणाला:
"मी सगळीकडे चांगले रस्ते बनवेन."
- समता म्हणाली: "मी सर्वांसाठी चांगले
आरोग्यसेवा आणेन."
गावकऱ्यांनी
विचार केला आणि मतदान घेतलं. ज्याला जास्त लोकांनी पसंत केलं,
त्याचा गट गाव चालवायला लागला.
हेच गट
म्हणजे राजकीय पक्ष!
ते लोकांसमोर आपले विचार मांडतात,
लोक मतदान करतात, आणि नंतर ते गाव (किंवा देश) चालवतात.
जर राजकीय पक्षाला जास्त मते मिळाली
तर तो सरकार बनवतो. सरकार बनवल्यावर ते रस्ते, शाळा,
दवाखाने, रोजगार वगैरे गोष्टींवर काम करतात. जर
त्यांना मते कमी मिळाली, तर ते विरोधी पक्ष म्हणून सरकारवर लक्ष
ठेवतात आणि चुका दाखवतात.
प्रत्येक पक्षाचा स्वतःचा एक विचार असतो.
उदा. काही पक्ष म्हणतात सर्व लोक समान असावेत, काही
म्हणतात देश आधी.
भारतामध्ये भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी,आमआदमी पार्टी असे वेगवेगळे पक्ष आहेत.राजकीय पक्ष म्हणजे
लोकांचे प्रतिनिधी, जे देशासाठी चांगले निर्णय घेण्यासाठी निवडले
जातात.
राजकीय पक्ष म्हणजे लोकांच्या काही विशिष्ट
विचारधारेवर आधारलेली संघटना असते, जी
निवडणुकांमध्ये भाग घेते आणि सत्तेत येण्याचा प्रयत्न करते. एका पक्षात अनेक लोक एकत्र
येतात आणि देश, राज्य किंवा गाव कसे चालवायचे यावर आपली मते ठरवतात.
हे लोक एकत्र येऊन एक ठराविक कार्यक्रम किंवा जाहीरनामा तयार करतात आणि त्यानुसार काम
करतात.
राजकीय पक्ष लोकांचे प्रश्न,
समस्या आणि गरजा ओळखून त्यावर उपाय सुचवतात. जर त्यांना निवडणुकीत बहुमत
मिळाले, तर ते सरकार स्थापन करतात आणि देश चालवण्याची जबाबदारी
घेतात. जर बहुमत मिळाले नाही, तर ते विरोधी पक्ष म्हणून काम करतात
आणि सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर लक्ष ठेवतात.
भारतासारख्या लोकशाही देशात राजकीय पक्ष
खूप महत्त्वाचे असतात. ते लोकांमध्ये जागृती निर्माण करतात,
त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवतात आणि वेगवेगळ्या गटांमध्ये संवाद
घडवून आणतात. प्रत्येक पक्षाची स्वतःची एक विचारसरणी (उदा. धर्मनिरपेक्षता,
समाजवाद, राष्ट्रवाद) असते.
उदाहरणार्थ,
भारतात भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (राकाँपा), शिवसेना,
समाजवादी पक्ष वगैरे विविध राजकीय पक्ष आणि त्यांची विचारधारा आहेत.
थोडक्यात सांगायचं झालं तर,
राजकीय पक्ष हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. तो लोकांना एकत्र
आणतो, नेतृत्व देतो, सरकार स्थापन करतो
आणि लोकांच्या हितासाठी काम करतो.
‘राजकीय पक्ष’ व्याख्या:
1. एडमंड बर्क (Edmund
Burke)
"A political party is a body of men
united for promoting by their joint endeavors the national interest, upon some
particular principle in which they are all agreed."
स्पष्टीकरण:
राजकीय पक्ष म्हणजे अशी लोकांची टीम जी एका विशिष्ट विचारावर एकमत
होते आणि देशाच्या भल्यासाठी एकत्र काम करते.
2. अॅन्थनी डाऊन्स (Anthony
Downs)
"A political party is a team of men
seeking to control the governing apparatus by gaining office in a duly
constituted election."
स्पष्टीकरण:
राजकीय पक्ष म्हणजे निवडणुकीत विजय मिळवून सरकार चालवायचा प्रयत्न
करणारी लोकांची टीम.
3. गिल क्रिस्टियन (Gilchrist)
"A political party is an organized group
of citizens who act together as a political unit, having distinctive aims and
opinions on political questions."
स्पष्टीकरण:
एक संघटित गट जो राजकीय प्रश्नांवर ठराविक मतांसह एकत्र काम करतो.
4. जेम्स ब्रायस (James
Bryce)
"Political parties are the life-blood of
every representative government."
स्पष्टीकरण:
लोकशाहीत राजकीय पक्ष म्हणजे जिवंतपणा देणारे रक्त, कारण त्यांच्यामुळे सरकार चालते.
5. रॉबर्ट डह्ल (Robert
Dahl)
"A political party is any political group
that presents at elections and is capable of placing through elections
candidates for public office."
स्पष्टीकरण:
राजकीय पक्ष म्हणजे असा गट जो निवडणुकीत उमेदवार उभा करतो आणि सत्ता
मिळवण्याचा प्रयत्न करतो.
6. हॅरॉल्ड लास्की (Harold
Laski)
"A political party is a voluntary
association of people, seeking to capture the government through constitutional
means."
स्पष्टीकरण:
राजकीय पक्ष हा लोकांचा असा गट आहे जो लोकशाही मार्गाने सत्ता
मिळवण्याचा प्रयत्न करतो.
7. लिओन एपस्टाईन (Leon
Epstein)
"Political parties are any group, however
loosely organized, seeking to elect governmental officeholders under a given
label."
स्पष्टीकरण:
राजकीय पक्ष म्हणजे एखादी टीम (छोटी किंवा मोठी) जी एक विशिष्ट नाव
घेऊन निवडणुकीत उभी राहते.
8. मॅकआव्हर (R.M.
MacIver)
"A political party is an association
organized in support of some principle or policy which by constitutional means
it seeks to make the determinant of government."
स्पष्टीकरण:
राजकीय पक्ष म्हणजे असे लोक, जे एखाद्या
तत्त्वासाठी संघटित होतात आणि लोकशाही पद्धतीने ते सरकारमध्ये आणू पाहतात.
9. मौरिस ड्यूवरजे (Maurice
Duverger)
"A political party is an organization
that seeks to place its candidates in public office."
स्पष्टीकरण:
राजकीय पक्ष हे उमेदवार उभे करून लोकांच्या मदतीने सत्ता मिळवणारे
गट आहेत.
10. ओस्टॉगर्स्की (Ostrogorski)
"Political parties are the instruments of
democracy and representative government."
स्पष्टीकरण:
राजकीय पक्ष म्हणजे लोकशाही आणि प्रतिनिधी शासन यांना बळकटी देणारी
साधने आहेत.
राजकीय पक्ष
= लोकांचे गट + ठराविक विचारधारा + निवडणूक लढणं + सरकार स्थापन
करणं
राजकीय पक्षांचे महत्त्व:
राजकीय पक्ष लोकशाही शासनाचा कणा
(म्हणजे मुळ आधार) आहेत. लोकशाही देशात लोक थेट देश चालवू शकत नाहीत,
त्यामुळे ते आपले प्रतिनिधी निवडून देतात. हे प्रतिनिधी कोणत्या
पक्षाचे असावेत, हे लोक ठरवतात. त्यामुळे राजकीय पक्ष
लोकांना एक विचारसरणीवर एकत्र आणतात आणि लोकशाहीला कार्यक्षम बनवतात.
1. लोकांमध्ये विचारांची एकजूट
घडवणे
राजकीय पक्ष लोकांमध्ये विविध
प्रश्नांवर विचारमंथन घडवतात. ते लोकांना विविध सामाजिक,
आर्थिक, राजकीय प्रश्नांवर जागरूक करतात.
यामुळे लोक एका विचारधारेच्या मागे एकत्र येतात आणि देशाच्या विकासात भाग घेतात.
2. निवडणुका लढवणे आणि प्रतिनिधी
निवडणे
राजकीय पक्ष निवडणुकीसाठी उमेदवार
उभे करतात. यातून लोकांना विविध पर्याय मिळतात. कोणत्या विचारधारेवर आणि
कार्यक्षमतेवर आधारित सरकार हवे आहे हे लोक ठरवू शकतात. त्यामुळे निवडणुकीत स्पष्ट
स्पर्धा होते आणि देशासाठी चांगले नेते निवडले जातात.
3. सरकार स्थापन करणे आणि चालवणे
निवडणुकीत ज्या पक्षाला बहुमत मिळते
तो सरकार स्थापन करतो. सरकार तयार झाल्यावर राजकीय पक्ष आपली धोरणे राबवतो आणि
देशाचा कारभार चालवतो. चांगले सरकार हे देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे
असते.
4. विरोधी पक्ष म्हणून भूमिका
बजावणे
ज्या पक्षाला सरकार बनवता येत नाही,
तो विरोधी पक्ष बनतो. विरोधी पक्ष सरकारवर सतत नजर ठेवतो आणि
चुकीच्या निर्णयांना विरोध करतो. त्यामुळे सरकार योग्यरित्या व पारदर्शक पद्धतीने
काम करत राहते.
5. जनतेच्या समस्या मांडणे
राजकीय पक्ष लोकांच्या समस्या ओळखून
त्या सरकारपर्यंत पोहोचवतात. ते आंदोलने करतात, मागण्या
करतात आणि जनतेच्या हितासाठी दबाव निर्माण करतात. त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज
सरकारपर्यंत पोहचतो.
6. नवीन नेतृत्व तयार करणे
राजकीय पक्षांमुळे समाजात नेतृत्व
तयार होते. तरुणांना संधी मिळते, वेगवेगळ्या
क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना राजकारणात स्थान मिळते. हे नविन नेतृत्व देशाच्या
उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असते.
प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट
विचारधारा असते. त्यानुसार ते शिक्षण, आरोग्य,
आर्थिक धोरण, रोजगार, सामाजिक
न्याय यांसारख्या क्षेत्रांमध्ये योजना तयार करतात आणि देशाच्या विकासाला दिशा
देतात.
8.राष्ट्रीय
ऐक्य राखणे: राजकीय पक्ष
देशातील विविध भाषा, धर्म, जात, प्रांत यांमधील लोकांना एकत्र आणण्याचे काम करतात. ते
सर्व नागरिकांमध्ये एकतेचा भाव निर्माण करतात आणि देशासाठी एकसंघ भावना जोपासतात.
9.सामाजिक
समतोल साधणे: राजकीय पक्ष
समाजातील वेगवेगळ्या गटांमध्ये (उदा. गरीब-श्रीमंत, ग्रामीण-शहरी, अनुसूचित जाती-जमाती) समतोल राखण्याचा प्रयत्न करतात.
सर्व घटकांना समान संधी आणि प्रतिनिधित्व मिळावे यासाठी ते धोरणे आखतात.
10.जनजागृती
वाढवणे: राजकीय पक्ष
लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांबद्दल, कर्तव्यांबद्दल आणि सरकारी योजनांबद्दल जागरूक करतात.
ते लोकांमध्ये मतदान, शिक्षण, आरोग्य याबद्दल जागृती निर्माण
करून लोकशाहीला बळकटी देतात.
राजकीय पक्ष हे लोकशाही यंत्रणेचे
हृदय आहेत. ते लोकांचे प्रतिनिधीत्व करतात, सरकार
चालवतात, चूक सुधारायला भाग पाडतात आणि देशाला पुढे नेण्याचे
काम करतात.
त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकाने राजकीय पक्ष आणि त्यांच्या
कार्याला समजून घेऊन मतदान करावे, हीच खरी लोकशाहीची गरज
आहे.
[ राजकीय पक्षांचे महत्त्व ]
--------------------------------------------------------------------------------------------
| | | | | | | | |
विचार निवडणूक सरकार विरोध जनतेच्या नेतृत्व
धोरण लोकशाही
एकजूट स्पर्धा चालवणे भूमिका समस्या
घडवणे ठरवणे मजबूत करणे
घडवतात निर्माण
करतात बजावतात मांडतात
तयार करतात करतात