राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची निवडणूक चिन्हे Name and symbol of National and Regional Political Parties

निवडणूक चिन्हे ही पक्षांची ओळख दर्शवतात आणि मतदारांना त्यांच्या पसंतीच्या पक्षाची निवड करण्यास मदत करतात. ही चिन्हे भारतीय निवडणूक आयोगाद्वारे अधिकृतपणे मंजूर केली जातात.
भारतातील राष्ट्रीय राजकीय पक्ष व त्यांची चिन्हे
क्र. | पक्षाचे नाव | निवडणूक चिन्ह |
---|---|---|
1 | भारतीय जनता पक्ष (BJP) | कमळ (Lotus) |
2 | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) | हात (Hand) |
3 | बहुजन समाज पार्टी (BSP) | हत्ती (Elephant) |
4 | भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) | मका व कोयता (Ears of Corn and Sickle) |
5 | भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (CPI-M) | हातोडा, कोयता आणि तारा (Hammer, Sickle and Star) |
6 | आम आदमी पार्टी (AAP) | झाडू (Broom) |
7 | नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) | पुस्तक (Book) |
भारतामध्ये प्रत्येक राज्यात विविध प्रादेशिक राजकीय पक्ष कार्यरत आहेत, ज्यांचे चिन्हे त्यांची ओळख दर्शवतात. खाली काही प्रमुख प्रादेशिक पक्षांची नावे आणि त्यांची चिन्हे दिली आहेत:
भारतातील प्रादेशिक राजकीय पक्ष व त्यांची चिन्हे
महाराष्ट्र
-
शिवसेना (Shiv Sena) – धनुष्यबाण (Bow and Arrow)
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) – घड्याळ (Clock)
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) – रेल्वे इंजिन (Locomotive)
उत्तर प्रदेश
-
समाजवादी पक्ष (SP) – सायकल (Bicycle)
-
राष्ट्रीय लोक दल (RLD) – हातपंप (Hand Pump)
बिहार
-
राष्ट्रीय जनता दल (RJD) – लालटेन (Lantern)
-
जनता दल (युनायटेड) JD(U) – बाण (Arrow)
पश्चिम बंगाल
-
ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (AITC) – फुलं व गवत (Flowers and Grass)
तामिळनाडू
-
द्रविड मुनेत्र कळघम (DMK) – उगवता सूर्य (Rising Sun)
-
ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (AIADMK) – दोन पाने (Two Leaves)
आंध्र प्रदेश
-
तेलुगु देसम पक्ष (TDP) – सायकल (Bicycle)
-
वायएसआर काँग्रेस पार्टी (YSRCP) – सीलिंग फॅन (Ceiling Fan)
ओडिशा
-
बिजू जनता दल (BJD) – शंख (Conch)
झारखंड
-
झारखंड मुक्ति मोर्चा (JMM) – धनुष्यबाण (Bow and Arrow)
जम्मू आणि काश्मीर
-
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (JKNC) – नांगर (Plough)
-
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) – शाईची बाटली आणि पेन (Ink Pot and Pen)
पंजाब
-
शिरोमणी अकाली दल (SAD) – तराजू (Weighing Scale)