आंतरराष्ट्रीय संबंधांचे सिद्धान्त : बहुलवादी सिद्धान्त प्रस्तावना बहुलवादी सिद्धान्त (Pluralist Theory) हा आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा आधुनिक दृष्टिकोन आहे. पारंपरिक वास्तववादी सिद्धान्ताने आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी सार्वभौम राष्ट्र-राज्य, सत्ता, राष्ट्रीय हि…